भारताची चांद्रमोहीम यशस्वी

भारताची चांद्रमोहीम यशस्वी :- 

  • ‘चांद्रयान- ३’मधील विक्रम लँडर त्यातील प्रज्ञान बग्गीसह ठरल्यानुसार २३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६.०४ मिनिटांनी अलगदपणे दक्षिण ध्रुवावर उतरले.
  • या भागात उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला आहे.
  • आतापर्यंत केवळ रशिया, अमेरिका आणि चीन हे तीनच देश चंद्रावर उतरण्यात यशस्वी झाले आहेत.

चांद्रयान-३ मोहिमेचे उदिष्ट :- 

  • चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लेंडर सुरक्षितपणे उतरवणे.
  • प्रगत अवकाशयान तंत्रज्ञान, चंद्रावर यान उतरविण्याचे तंत्रज्ञान, स्वदेशी उपकरणे यांच्या चाचण्या घेणे.
  • इतर ग्रहांवरील मोहिमांसाठी आवश्यक असलेल्या नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करणे.
  • चंद्राच्या दक्षिण भागात अब्जावधी वर्षापूर्वीचे खडक आहेत. त्यांच्या पृष्ठभागाचा अभ्यास करणे. त्याद्वारे सौरमालेच्या उगमासंबंधी धागेदोरे मिळविण्याचा प्रयत्न करणे.
  • बर्फाच्या स्वरूपातील पाण्याच्या साठ्याचा शोध घेणे.

भारताचा अवकाश संशोधन इतिहास

  • ५ ऑगस्ट १९६९ – भारतीय अवकाश संशोधन संघटनेची (इस्रो) स्थापना
  • १९ एप्रिल १९७५ – पहिला उपग्रह ‘आर्यभट्ट’चे रशियाच्या प्रक्षेपण केंद्रातून उड्डाण
  • १८ जुलै १९८० – ‘एसएलव्ही-३’ची चाचणी यशस्वी. त्याच्या माध्यमातून ‘इस्रो’ने रोहिणी उपग्रह (आरएस-१) पृथ्वीच्या कक्षेत स्थापन केला
  • ३० ऑगस्ट १९८३ – दूरसंचार, दूरदर्शन प्रसारण आणि हवामानाच्या अंदाजासाठी इन्सॅट-१ बीचे प्रक्षेपण
  • २० सप्टेंबर १९९३ – पोलर सॅटेलाइट लाँच व्हेइकलचे (PSLV) यशस्वी चाचणी. या प्रक्षेपणाच्या मदतीने आतापर्यंत ५० पेक्षा जास्त यशस्वी उड्डाणे झाली आहेत
  • २२ ऑक्टोबर २००८ – अवकाश क्षेत्रात ‘इस्रो’ने एक पाऊल पुढे टाकले. ऐतिहासिक चंद्रमोहिमेला प्रारंभ करीत एक हजार ३८० किलो वजनाचे ‘चांद्रयान-१’ अवकाशात सोडण्यात आले
  • २४ सप्टेंबर २०१४ – ‘इस्रो’चे मंगलयान मंगळ ग्रहाच्या कक्षेत स्थापन. ५ नोव्हेंबर २०१३ मध्ये मार्स ऑर्बिटर मिशन (एमओएम) म्हणजेच मंगलयानाचे प्रक्षेपण. भारताची पहिल्याच प्रयत्नात यशाला गवसणी. असे करणारा भारत जगातील चौथा देश ठरला
  • २२ जुलै २०१९ – दुसरी चांद्रयान मोहिमेतील ‘चांद्रयान-२’चे प्रक्षेपण, यात यान चंद्रावर उतरविण्यास अपयश
  • १४ जुलै २०२३ – ‘चांद्रयान-२’चा पुढील टप्पा ‘चांद्रयान-३’चे यशस्वी प्रक्षेपण
  • २३ ऑगस्ट २०२३ – ‘चांद्रयान- ३’ सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चंद्रावरच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी पणे उतरले.

८० लाख लोकांनी पहिले थेट प्रक्षेपण – ‘चांद्रयान-३ चे विक्रम लँडर २३ ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. ही ऐतिहासिक घटनेचे थेट प्रक्षेपण ‘इस्रो’च्या यूट्युब वाहिनीवर ८० लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिले. थेट प्रक्षेपणावेळी सर्वांत जास्त यूजर मिळालेली ‘इस्रो’ची वाहिनी जगातील पहिली ठरली आहे.

सी. आर. राव यांचे निधन

  • हैदराबाद प्रख्यात भारतीय सांख्यिकीतज्ज्ञ सी. आर. राव यांचे २३ ऑगस्ट २०२३ रोजी वयाच्या १०२व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले.
  • संख्याशास्त्राबरोबरच जनुकीय विज्ञान, मानववंशशास्त्र, अर्थशास्त्र अशा विषयांचा त्यांचा अभ्यास होता.
  • यावर्षी त्यांना ‘इंटरनॅशनल प्राईझ इन स्टॅटिस्टिक्स-२०२३’ हा पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार संख्याशास्त्रातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.
  • रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांसाठी विशेषतः एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलेच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाने कोणत्या पथकाची निर्मिती केली आहे? – तेजस्विनी पथक
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Inline Feedbacks
View all comments
0
Would love your thoughts, please comment.x
()
x
Scroll to Top