Maharashtra Police Bharti 2024 संपूर्ण माहिती : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत हे आमच्या www.spardhaguru.in या वेबसाईटवर. या ठिकाणी आम्ही Maharashtra Police Bharati 2024 संदर्भात संपूर्ण माहिती दिली आहे. या ठिकाणी तुम्हाला पुढील माहिती मिळेल.
- वयोमर्यादा
- शैक्षणिक पात्रता
- शारीरिक पात्रता
- आवश्यक कागदपत्रे
- परीक्षा शुल्क
- शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- निवड प्रक्रिया
- जाहिरात
- मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका
- सराव प्रश्नपत्रिका
Maharashtra Police Bharati 2024 Age Limit :
Age Limit for Police Constable Bharti :
महाराष्ट्र पोलीस अंतर्गत पोलीस शिपाई भरतीसाठी पुढील वयोमर्यादा आहे.
क्र. | प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा |
१ | खुला (Open) | १८ वर्षे | २८ वर्षे |
२ | मागास प्रवर्ग (SC, ST, VJ-A, NT-B, NT-C, NT-D, SBC, OBC, EWS) | १८ वर्षे | ३३ वर्षे |
३ | प्रकल्पग्रस्त | १८ वर्षे | ४५ वर्षे |
४ | भूकंपग्रस्त | १८ वर्षे | ४५ वर्षे |
५ | माजी सैनिक | १८ वर्षे | उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक ३ वर्षे इतकी राहील. |
६ | पदवीधर/पदविकाधारक अंशकालीन उमेदवार | १८ वर्षे | ५५ वर्षे |
७ | अनाथ | १८ वर्षे | ३३ वर्षे |
समांतर आरक्षणा अंतर्गत येणारे उमेदवार
क्र. |
प्रवर्ग | किमान वयोमर्यादा | कमाल वयोमर्यादा | |
खुला प्रवर्ग | मागास प्रवर्ग | |||
१ | महिला | १८ वर्षे | २८ वर्षे | ३३ वर्षे |
२ | खेळाडू | १८ वर्षे | २८ + ५ वर्षे | ३३ + ५ वर्षे |
३ | पोलीस पाल्य | १८ वर्षे | २८ वर्षे | ३३ |
४ | गृहरक्षक | १८ वर्षे | २८ | ३३ |
५ | माजी सैनिकावर अवलंबून असलेले | १८ वर्षे | २८ + ३ वर्षे | ३३ + ३ वर्षे |
Educational Qualification For Maharashtra Police Bharti 2024
- Police bharati साठी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता १२ वी) किंवा शासनाने या परिक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- समकक्ष मध्ये पुढील बाबी येतात :-
- यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक (विद्यापिठाची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष उत्तीर्ण झालेला वा यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी धारण केलेला उमेदवार) चालेल. maharashtra police bharati
- विद्यापीठे, मानीव विद्यापीठे, ऐच्छिक मान्य शैक्षणिक संस्था यांनी प्रदान केलेल्या पदवीका समकक्षमता
- व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने ०२ वर्षे कालावधीच्या अभ्यासक्रमांना उच्च शिक्षणासाठी २ स्तराची समकक्षता निश्चित केलेले
- डिप्लोओ इन मेकेलिकल इंजिनियरिंग
- माजी सैनिक : १५ वर्षे सैनिकी सेवा पूर्ण असणाऱ्यांच्या बाबतीत नागरी परीक्षा इयत्ता १० वी उत्तीर्ण किंवा IASC (Indian Army Special Certificate of Education) प्रमाणपत्र व १५ वर्षे सैनिकी सेवा पूर्ण नसलेल्यांच्या बाबतीत इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद :- शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जे इयत्ता ७ वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते भरतीकरता पात्र ठरतील.
Physical Criteria for Maharashtra Police Constable Bharti
पोलीस शिपाई भरतीसाठी पुढील शारीरिक पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे.
महिला उमेदवार | पुरुष उमेदवार | |
उंची | 155 cm पेक्षा कमी नसावी | 165 cm पेक्षा कमी नसावी |
छाती | —
Maharashtra Police Bharti 2024 |
न फुगवता 79 cm पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 cm पेक्षा कमी नसावा. |
सूट :-
- शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल:
- उंची : ४.० सें.मी. महिला व पुरुष उमेदवारांसाठी..
- छाती : छातीच्या मोजमापाची आवश्यकता नाही.
- खेळाडू उमेदवारासाठी आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें. मी. इतकी सूट देय राहील.
- पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांबाबत :- पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आहे अशा कर्मचाऱ्यांच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल.
- उंची : २.५ सें.मी. पुरुष व महिला उमेदवारांसाठी.
- छाती : २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून पुरुष उमेदवारांसाठी
Required Doccuments for Police Bharti
पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे
- सर्व आवश्यक ती प्रमाणपत्रे व कागदपत्रे आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किंवा त्यापुर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. (Maharashtra Police Bharti 2024)
- SSC /HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र
- जन्मदाखला
- रहिवाशी प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- संगणक परीक्षा-उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT)
- खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल
- महिला उमेदवारांकरिता व अजा, अज उमेदवार वगळता इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
- माजी सैनिकांसाठी Discharge प्रमाणपत्र
- गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र
- प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र
- भुकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र
- पोलीस पाल्य प्रमाणपत्र
- अनाथाबाबतचे प्रमाणपत्र
- अंशकालीन प्रमाणपत्र
- इडब्ल्यूएस प्रमाणपत्र
- NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.
- Maharashtra Police Bharti 2024
- उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील.
Maharashtra Police Bharti Physical Test
पोलीस भरतीसाठी पुढील प्रमाणे शारीरिक चाचणी घेतली जाते. Physical test is conducted for Maharashtra police Bharti as follows.
पोलीस शिपाई पदाकरीता (For Police Constable Post) :
- महाराष्ट्र पोलीस शिपाई ( सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुदींनुसार पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेत (Maharashtra Police Bharti 2024) उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल :-
- पुरुष उमेदवार :
- १६०० मीटर धावणे – २० गुण
- १०० मीटर धावणे – १५ गुण
- गोळाफेक – १५ गुण
- एकुण – ५० गुण
- महिला उमेदवार :
- ८०० मीटर धावणे – २० गुण
- १०० मीटर धावणे – १५ गुण
- गोळाफेक – १५ गुण
- एकुण – ५० गुण
पोलीस शिपाई चालक पदाकरीता (For Police Constable Driver Bharti) :
- महाराष्ट्र सहायक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक (सेवाप्रवेश) नियम, २०१९ मधील तरतुदींनुसार व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी सुधारीत केलेल्या तरतुर्दीनुसार पोलीस शिपाई चालक पदाच्या भरती प्रक्रियेत उमेदवारांची खालीलप्रमाणे ५० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाईल :-
- पुरुष उमेदवार :-
- १६०० मीटर धावणे – ३० गुण
- गोळाफेक – २० गुण
- एकुण – ५० गुण
- महिला उमेदवार :-
- ८०० मीटर धावणे – ३० गुण
- गोळाफेक – २० गुण
- एकुण – ५० गुण
Maharashtra Police bharati Written Test
महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पुढील प्रकारची (Maharashtra Police bharati Written Test) लेखी परीक्षा घेतली जाते.
- पोलीस शिपाई पदाकरीता (For Police Constable) :-
- शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील.
- उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.
- लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल. पोलीस आयुक्त, मुंबई शहर यांच्या घटकावरील भरती प्रक्रिया वगळता सर्व पोलीस घटकांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
- लेखी परीक्षेमध्ये खालील विषयांचा समावेश असेल:-
- अंकगणित
- सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
- बुध्दीमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण
- पोलीस शिपाई चालक पदाकरीता :-
- शारीरिक चाचणी मध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवार, संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० या प्रमाणात १०० गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरीता बोलाविण्यास पात्र असतील. Maharashtra Police Bharti 2024
- लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी (अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) व (ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी (२५ गुण) अशा दोन चाचण्या द्याव्या लागतील. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
- कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.
- कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना लेखी चाचणीसाठी बोलविण्यांत येईल. लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल. पोलीस आयुक्त, मुंबई शहर यांच्या घटकावरील भरती प्रक्रिया वगळता सर्व पोलीस घटकांच्या भरती प्रक्रियेतील लेखी परीक्षा ही एकाच दिवशी आयोजित करण्यांत येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.
- लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल :-
- अंकगणित
- सामान्यज्ञान व चालू घडामोडी
- बुध्दीमत्ता चाचणी
- मराठी व्याकरण आणि
- मोटार वाहन चालविणे / वाहतुकीबाबतचे नियम
जिल्हानिहाय पोलीस भरती जाहिराती
- Brihanmumbai Police Bharti 2024
- Thane City Police Bharti 2024
- Pune City Police Bharti 2024
- Pimpri Chinchwad Police Bharti 2024
- Mira Bhayander Police Bharti 2024
- Nagpur City Police Bharti 2024
- Navi Mumbai Police Bharti 2024
- Amravati City Police Bharti 2024
- Solapur City Police Bharti 2024
- Lohmarg Mumbai Police Bharti 2024
- Thane Police Bharti 2024
- Raigad Police Bharti 2024
- Palghar Police Bharti 2024
- Sindhudurg Police Bharti 2024
- Ratnagiri Police Bharti 2024
- Nashik Police Bharti 2024
- Ahmednagar Police Bharti 2024
- Dhule Police Bharti 2024
- KolhapurPolice Bharti 2024
- Pune Police Bharti 2024
- Satara Police Bharti 2024
- Solapur Police Bharti 2024
- Aurangabad Police Bharti 2024
- Nanded Police Bharti 2024
- Parbhani Police Bharti 2024
- Hingoli Police Bharti 2024
- Nagpur Police Bharti 2024
- Bhandara Police Bharti 2024
- Chandrapur Police Bharti 2024
- Wardha Police Bharti 2024
- Gadchiroli Police Bharti 2024
- Gondia Police Bharti 2024
- Amravati Police Bharti 2024
- Akola Police Bharti 2024
- Buldhana Police Bharti 2024
- Yavatmal Police Bharti 2024
- Lohmarg Pune Police Bharti 2024
- Lohmarg Aurangabad Police Bharti 2024