लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) म्हणजे काय?
- जोसेफ लुईस लॅग्रेज या फ्रेंच, इटालियन गणितज्ज्ञाने १७७२ मध्ये सर्वप्रथम अवकाशातील तीन घटकांच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रश्न सोडवला.
अवकाशातील दोन मोठ्या वस्तुमानाच्या घटकांचे गुरुत्वाकर्षण पाच बिंदूंवर समसमान असते, असे लॅग्रेंजने दाखवून दिले. त्यांनाच लॅग्रेंज पॉइंट (Lagrange Point) असे म्हणतात. त्या बिंदूंना L1 ते L5 अशी नावे देण्यात आली. - या बिंदूंवर लहान वस्तू आली असता, मोठ्या घटकांच्या गुरुत्वीय घटकांच्या प्रभावामध्ये ती लहान वस्तू अवकाशातून विशिष्ट कक्षेतून संचार करते.
- सूर्य आणि पृथ्वी यांना जोडणाऱ्या सरळ रेषेत सूर्यापलीकडे ‘L3’, सूर्य आणि पृथ्वीदरम्यान पृथ्वीपासून १५ लाख किलोमीटर अंतरावर ‘L1’, पृथ्वीच्या पलीकडे १५ लाख किलोमीटरवर ‘L2’ असे बिंदू येतात.
- ‘L4’ आणि ‘L5’ हे बिंदू पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या कक्षेवर दोन्ही घटकांपासून समान अंतरावर असतात.